औरंगाबाद : येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून पत्रके त्यांच्या अंगावर फेकली. यावर मनसेचा हा प्लॅन आम्हाला माहिती असती तर आम्ही प्लॅन आखला असता अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांती चौकातून जाणार असल्याचे कळल्यानंतर अनेक मनसेसैनिक हातात झेंडे घेऊन क्रांती चौकात दाखल झाले. गाडी येताच त्यांच्या गाडीला घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली.
त्यामुळे खैरे यांना गाडीच्या बाहेर यावे लागले. यावेळी खैरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक घोषणाबाजी करत औरंगाबादचे नामांतर का होत नाही? असा जाब खैरे यांना विचारला. त्याचवेळी मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रके खैरे यांच्या अंगावर फेकून दिली.
यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या खैरे यावेळी शांततेच्या भुमिकेत राहिले. तसेच माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले की, मनसेचा हा प्लॅन आम्हाला माहिती असती तर आम्ही प्लॅन आखला असता.
महत्वाच्या बातम्या
- ना ईव्हीएम ना मतपत्रिका ; अजित पवारांनी सांगितला तिसराच पर्याय!
- ‘संज्या राऊतचा आमदार भाऊ फेरीवाल्यांकडून दिवसाचे १० रुपये घेतो’
- परभणीत ‘महाबीज’ची राज्य बियाणे प्रयोगशाळा
- ‘शेतकऱ्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या’
- पालखेड कालव्याच्या निमित्ताने वैजापुरात जलक्रांती

