Share

…तर संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने वादाची कबुलीच ?

Published On: 

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते.

भाजपने आक्रमक भूमिका जाहीर केली असतानाच संभाजीराजेंनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. तर, २९ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा शिवराज्याभिषेक दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ न दिल्याने संभाजीराजे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर, संभाजीराजे आणि भाजप यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे हा वाद उघड झाला आहे.

कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘छत्रपती संभाजी राजेंविषयी आम्हाला आदरच आहे, परंतु कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत मराठा समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करायचा नाही अशी जर त्यांची भूमिका असेल तर ती आम्हाला मान्य नाही. मविआ सरकार कोरोनाकाळात भ्रष्टाचार करत सुटले असेल, तर मराठा समाजाने शांत का राहावे?,’ असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!