Share

७ वर्षात मोदी सरकारने विकास नाही तर देश भकास केला – काँग्रेस

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रातील मोदी सरकारला आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या अपयशी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज राज्यात सर्व ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

निदर्शनाच्या ठिकाणी मोदी सरकारच्या ७ प्रमुख अपयशाचे मुद्दे व प्रतिकात्मक ७ पुतळे तयार करून त्यातील प्रत्येक पुतळ्यावर काळ्या रंगाचा मुखवटा लावण्यात आला. यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकारने ७ वर्षात जनतेची पिळवणूक केली आहे. अच्छे दिनचे स्वप्न व १५ लाखाचे अमिष दाखवून या जुमला सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी नोटबंदी करताना सांगितले की नोटबंदीमुळे भ्रष्टाचार थांबेल, पैशाचा काळाबाजाराला आळा बसेल व देशातील दहशतवाद संपुष्टात येईल. वास्तविक पाहता असे काही झाले नाही.

याउलट देशाची अर्थ व्यवस्था ढासळली. गेल्या ७ वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोदी सरकारने दोनदा डल्ला मारला. जीवनावश्यक वस्तूंची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दराने उच्चांक गाठला आहे. सुरूवातीपासूनच कोरोना संसर्ग रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. त्यांच्या गाफिलपणामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

शेतकरी संघटनेशी कुठलीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधी काळे कायदे केले. गेली अनेक महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ आंदोलने करीत आहेत परंतु पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून हुकूमशाही पध्दतीने नवीन शेतकरी कायद्याची अमंलबजावणी करीत आहे. देशाच्या १३० कोटी जनतेच्या लसीकरणाचे नियोजन न करता जगात आपले नावलौकिक करण्यासाठी ९३ छोट्या देशाला लस पुरविली. परीणाम आज देशाच्या जनतेला पुरेशी लस उपलब्ध नाही. ‘मोदी सरकारने ७ वर्षात न केला विकास पण देश केला भकास,’ असा टोला रमेश बागवे यांनी लगावलाय.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!