🕒 1 min read
कोल्हापूर : भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष हा अधिक तीव्र झाला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे आमने-सामने आले आहेत.
‘हे महाविकास आघाडीचे सरकार राज्य झोपेत असताना पडेल,’ असं चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर बोलताना बहुतेक पाटील झोपेतच हे बोलले असतील, असा चिमटा अजित पवार यांनी काढला होता. यानंतर चंद्रकांत पाटील यांचा पारा चांगलाच तापलेला दिसून आलं.
‘शरद पवार झोपेतून उठायच्या आधी शपथ घेऊन तुम्ही मोकळे झाला होता. तुम्ही आमच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झाला. शपथही घेतली, पण २८ आमदार सुद्धा तुम्हाला सोबत ठेवता आले नाहीत. सरकार कोणतंही आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतात. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाशी कशाला सांगड नाही. फक्त ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार. अजितदादा, यापुढे आमच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर फार अवघड जाईल,’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
अजित पवारांवरील या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका केली आहे. ‘चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांना तंबी दिली होती, हे बरोबर नाही. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं,’ असं हसन मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या या विधानानंतर हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरसकट महाराष्ट्राला शिथिलता मिळणार की निर्बंध कायम राहणार ? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद
- मान्सून लांबणीवर ? केरळात १ ऐवजी ३ जूनला दाखल होणार, तर राज्यात मान्सून पूर्व पावसाचा इशारा !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘मोदींकडून पुलवामातील शहिदांचा राजकीय वापर, विकास नव्हे तर विखार हाच मोदींचा अजेंडा’
- ‘मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, नागरिकांना लॉकडाऊनमध्ये ठेवणं त्यांनाही आवडत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

