Share

…म्हणून उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; किरीट सोमय्या यांची मागणी

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी, मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण १२ जणांनी विविध भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. त्यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन आरोपांमधील तथ्य समोर आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

आता किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनीही त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बेनामी बंगले बांधले आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांनी अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा देखील चांगलाच समाचार घेतला. ‘तुम्ही काय मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांनाही घाबरत नाही. परब यांना आज ना उद्या कोर्टात जावंच लागणार आहे. परब हे जेलमधूनच कोर्टात जाऊ शकतात. सर्वांना कायदा समान आहे,’ असं देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘हसन मुश्रीफ यांची प्रकृती लवकर बरी व्हावी. सोमवारी मी कोल्हापूरला जाणार आहे. मुश्रीफ यांनी बेनामी साखर कारखाना उभारला हे मी कोल्हापूरकरांसमोर मांडणार आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!