मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांची गाडी आढळल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने एन आय ने केलेल्या तपासात गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. सदर प्रकरणात असणारी स्कॉर्पियो गाडीच्या मागे असणारी युनोव्हा गाडी ही क्राईम ब्रांच ची सचिन वाझे ची असल्याचे एन आय ए च्या तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी सुरुवातीपासून राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने भूमिका चुकीची घेऊन संशयास्पद असणाऱ्या सचिन वाझेला पाठीशी घालण्याची चुकीची भूमिका घेतली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने एन आय ए ने अत्यंत योग्य कारवाई केली असून या प्रकरणातील सत्य लवकरच जनतेसमोर येईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सचिन वाझे ला अटक करण्याची मागणी सुरुवातीपासून केली मात्र राज्य सरकारने सचिन वाझे ला पाठीशी घालण्याचा चुकीचा प्रयत्न केला. असे अधिकारी मुंबई पोलिसांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा ठरतात. असे रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, ‘उद्योजक मुकेश अंबानी यांनी लाखो लोकांना रोजगार दिला आहे. त्यांच्या घरासमोर स्फोटकांची स्कॉर्पियो उभी करण्यात आली. ती स्कॉर्पियो गाडी चोरून आणली होती. त्या गाडीमागे असणारी युनोव्हा गाडी क्राईम ब्रॅंच ची सचिन वाझेची होती. हे सत्य चौकशीत समोर आले आहे. त्या स्कॉर्पियो गाडीचा मालक मनसुख हिरेन याचीही झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांना अटक करा अशी मागणी विरोधी पक्ष करीत होता. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी सचिन वाझेंना अटक केली नाही. महाराष्ट्र पोलिसांवर महाराष्ट्र् सरकारचा दबाव होता. राज्य सरकार सचिन वाझेना पाठीशी घालत होते. मात्र या प्रकरणी एन आय ए ने केलेली कारवाई अत्यंत योग्य आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास वाढविणारी कारवाई ठरली आहे.या प्रकरणात एन आय ए मुळे सत्य समोर येईल,’ असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- २ हजारांची नोटही बाद होते की काय? २ वर्षांपासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंदच
- लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले, सरकारने त्यावर मीठ चोळले!
- ‘बेळगाव प्रश्नी काही लोकांचा अनावश्यक हस्तक्षेप’, कुमारस्वामींनी शिवसेनेला डिवचले
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल


