Share

…म्हणून पुणेकरांनी फडणवीस आणि माझ्यावर टीका केली होती- नितीन गडकरी

Published On: 

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी फडणवीस आणि त्यांच्यावर पुणेकरांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. ‘आधीपासून पुण्याशी माझा जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विशेषतः पुण्याकडे, नागपूरकडे माझं लक्ष आहे. मी दोन्ही जिल्ह्यांना मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही. नागपूरच्या मेट्रोचं काम पुढं गेलं. त्यावेळी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका झाली’,  असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

पुण्यात मेट्रो भुयारी करायची, की वरून सुरू करायची यावर वाद होते. आग्रहाने निर्णय घेतला आणि मेट्रोच्या कामाची सुरुवात झाली. याचा मला आनंद आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आज पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्यात येताना दुख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ बहिण राहत होती, पर्वतीवर जाऊन खायचं, आताचे पुणे प्रदूषित झालं, जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!