Share

…म्हणून शानदार कामगिरी करणाऱ्या फाफ डु प्लेसिसचं शतक थोडक्यात राहिलं !

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सध्या धुमशान सुरु आहे. यंदा आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोरोनाच्या सावटामुळे मोजक्याच स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. आज आयपीएलमध्ये डबल हेडरची रंगत पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध सनराइझर्स हैद्राबादच्या लढतीत हैद्राबादने विजय मिळवला आहे.

तर, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट राइडर्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात असून कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चेन्नईने फलंदाजी करताना सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.

सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड याने फाफ डु प्लेसीसच्या मदतीने शतकी भागीदारी रचली. चेन्नई संघाच्या धावा ११५ वर असताना चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर ऋतुराज झेलबाद झाला. यानंतर देखील फाफ डु प्लेसीसने आपली आक्रमक खेळी चालू ठेवली. मोईन अलीने त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाद झाला. यानंतर, कर्णधार महेंद्रसिंह धोनी आला. त्याने फटकेबाजी केली. आठ चेंडूंमध्ये १७ धावा करून तो झेलबाद झाला.

यानंतर, रवींद्र जडेजाने येताच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. दुसऱ्या बाजूला फाफ डु प्लेसीस तुफान फटकेबाजी करतच होता. मात्र, २० षटकांचा खेळ संपल्याने डु प्लेसीस च शतक थोडक्यात हुकलं. त्याने ४ षटकार आणि ९ चौकरांच्या मदतीने ६० चेंडूंमध्ये ९५ धावा बनवल्या. शेवटचे तीन चेंडू बाकी असताना तो ८८ धावांवर होता. यानंतर त्याने षटकार मारला. २ चेंडूंमध्ये ९४ धावांवर असल्याने तो आणखी एक षटकार मारेल असं वाटलं. मात्र, एक धाव घेऊन त्याने रवींद्र जडेजाला स्ट्राईक दिली. रवींद्र जडेजाने येताच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. तर, डाव संपल्याने नाबाद ९५ धावांवर डु प्लेसीसला समाधान मानावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!