मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात काल तब्बल ३० हजार ५३५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने राज्याची वाटचाल ही बिकट परिस्थितीकडे होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला असला तरी मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. तसेच, सर्व स्थानिक प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असं ते म्हणाले.
तर, ‘मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे कोरोना नियमांची सक्तीने अंमलबजावणी केली पाहीजे. कोरोना लसीकरणात मोठ्या संख्येने वाढ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. खासगी रुग्णालयाने मागणी केल्यास लसीकरणासाठी परवानगी देणार,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी पवारांच्या दाव्याला ठरवलं खोटं, मग अनिल देशमुखांनी दिलं चोख प्रत्युत्तर
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- कौतुक तर होणारच : मराठमोळ्या सावनी रवींद्र आणि पल्लवी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
- भाजप नेते हरिभाऊ बागडे बँकेच्या निवणुकीत पराभूत


