दिल्ली : भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे आज घोषित करण्यात आली आहेत.
यामध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, अभिनेत्री पल्लवी जोशी व गायिका सावनी रवींद्र यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे.
सावनी रवींद्र ला रान पेटलं या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून गौरवण्यात येणार आहे. बार्डो (Bardo) या चित्रपटातील हे गाणं आहे. तर, ताश्कंत फाईल्स या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशी यांना गौरवण्यात येणार आहे. ताश्कंत फाईल्स हा चित्रपट अनेक चित्रपटतज्ज्ञांच्या पसंतीस उतरला होता.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी –
बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना रानौत (पंगा, मणिकर्णिका)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र (रान पेटलं – Bardo)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी पवारांच्या दाव्याला ठरवलं खोटं, मग अनिल देशमुखांनी दिलं चोख प्रत्युत्तर
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- ‘या’ दोन चित्रपटांसाठी बॉलिवूड क्वीन कंगना रानौतला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर !
- भाजप नेते हरिभाऊ बागडे बँकेच्या निवणुकीत पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

