Share

…म्हणून सॅम बिलिंग्जला सारा म्हणाली, ‘तू देखील गोलंदाजी का करत नाहीस?’

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा आज पार पडत आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

आज अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. दरम्यान, आजच्या लिलावामध्ये अष्टपैलू व गोलंदाजी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागल्याचं दिसून आलं आहे. सर्वाधिक पहिल्या पाच बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये केवळ अष्टपैलू व गोलंदाजांचा समावेश आहे.

आयपीएलच्या १३ व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळलेल्या सॅम बिलिंग्जला पहिल्या फेरीत बोली देखील लागली नाही. यावर त्याने त्याच्या गर्लफ्रेंडने केलेलं भाष्य ट्विटरवर सांगितलं आणि ते झटपट व्हायरल झालं. ‘माझी गर्लफ्रेंड सारा पलटली आणि मला बोलली, ‘तू गोलंदाजी का करत नाहीस ?’ दरम्यान, लिलावाच्या दुसऱ्या फेरीत सॅम बिलिंग्जवर बोली लागली असून २ कोटी रुपयांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!