दिल्ली : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
बाहेरील देशांकडून आता मदत येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण करत कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, देशात आता तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वर्तवली जात असतानाच ICMR ने महत्वाची टिपण्णी केली आहे.
साधा सर्दी,टॅप, खोकला असला तरी अनेक नागरिक भीतीने कोरोना निदानासाठी RT-PCR चाचणी करतात. पण सरसकट कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हणजेच ICMR ने सांगितलं आहे. यासोबतच, कोणी कोरोना चाचणी करावी वा कोणी करायला नको, याबाबत देखील नियमावलीद्वारे खुलासा करण्यात आला आहे.
RT-PCR चाचणीबाबतची नियमावली –
जर अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही.
आरटी-पीसीआर टेस्ट एकदा पॉझिटिव्ह आली तर पुन्हा करण्याची गरज नाही.
होम आयसोलेशनचे दहा दिवस पूर्ण झाले असतील आणि त्यातील शेवटचे तीन दिवस ताप नसेल तर आरटी-पीसीआर टेस्ट करू नये.
कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर डिस्चार्ज देताना पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही.
आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट नको.
रॅपिड अँटिजेन टेस्टवर भर देणं गरजेचं. यासोबतच, ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत आणि त्यांची RAT टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांची RT-PCR टेस्ट करावी.
महत्वाच्या बातम्या
- ‘भुजबळांना धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा’
- ‘चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊंच्या कामाचे श्रेय घेऊ नये’, रोहिणी खडसेंचा टोला
- इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली कृषी सहायकाला ३३ लाखांचा गंडा
- ‘स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्रावर टीका’
- आता फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना डिजिटल कर भरावा लागणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

