नाशिक : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मंगळवारी दुपारी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. पत्रकारांनी त्यांना ‘त्या नाईलाजास्तव गोष्टी कोणत्या ?’ असा प्रश्न विचारला. त्यावर राजेश टोपेंनी ताबडतोड उत्तर दिलं आहे.
‘एव्हरिथिंग ईज फेअर इन लव्ह अँड राजकारण’ असे राजकारणात दुर्दैवाने झाले आहे, वास्तविक राजकारणी खूप आदर्श असावा असे आमचे व्यक्तिगत मत आहे. काही काही काळानुरूप गोष्टी घडतात. त्या भाऊंसारख्या वयाच्या लोकांना जमणार नाही, असं उत्तर दिल्याने राजेश टोपे यांचा नक्की नेम कोणाकडे? राजकारणातील अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या भाऊंसारख्या वयाच्या लोकांना जमणार नाहीत ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
राजेश टोपे यांनी नाशिकमध्ये काल केलेली दोन वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत. पहिलं म्हणजे ‘राजकारणात नाईलास्तव काही गोष्टी कराव्या लागतात’ आणि दुसरे म्हणजे ‘अजितदादांकडे काही आग्रहपूर्वक मागणी करायला गेलो की दादा म्हणतात चला रे राजेशचा जरा कोरोनाचा खर्च कमी करून टाकू’,
राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर महात्मानगरला एका लसीकरण केंद्राला त्यांनी भेट देत के के वाघ महाविद्यालयात हजेरी लावली होती. के के वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे 90 व्या वर्षात पदार्पण होत असल्याने टोपे त्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार इथे करण्यात आला. तसेच आरोग्यमंत्री म्हणून कोरोना काळात करत असलेल्या उल्लेखनीय कामाबाबत राजेश टोपे यांचाही सत्कार संस्थेतर्फे पार पडला.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा; नाराणय राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रहारमधून आव्हान
- अनिल देशमुखांच्या शोधासाठी केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय, पकडण्यासाठी परत छापेमारीची शक्यता
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता


