🕒 1 min read
कोल्हापूर : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महारसाहतराला लवकरात लवकर व मुबलक लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लसीच्या उत्सवावर स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. तसेच, ‘सात दिवसाच्या आत महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही.’ अशा निर्वाणीचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.
‘महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी ११ एप्रिलपासून लसीकरण उत्सव सुरु केले आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, लस घेण्यासाठी महाराष्ट्रातले लोक आक्रोश करतायत. लसींअभावी राज्यातले लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत याकडे पंतप्रधानांचे लक्ष आहे का ?’ असा सवाल शेट्टींनी विचारला आहे.
सात दिवसाच्या आत महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही. @CMOMaharashtra @PMOIndia @narendramodi @rajeshtope11 @ANI @AmitShah pic.twitter.com/GPiiYPnOT0
— Raju Shetti (@rajushetti) April 9, 2021
पुढे ते म्हणाले, ‘आज देशातील कोरोना रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात सापडतायत. त्यामुळे लसींचा पुरवठा हा महाराष्ट्रात जास्त करायला पाहिजे एवढी साधी बाब त्यांच्या लक्षात येत नसेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून मी आज देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. जर महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही,’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला असून महाराष्ट्राला सापत्न वागणूक का ? असा सवाल देखील केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अजितदादांच बोलणं टग्यासारखं पण रडणं बाईसारखं : गोपीचंद पडळकर
- वीकेंड लॉकडाऊन : पुण्यात काय काय सुरु ? महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वाची माहिती
- देशात राफेल आणि राज्यात वाझे; त्यामुळेच महाराष्ट्रात कोरोना वाढतोय का ? – आंबेडकर
- आयपीएलची टशन : क्रिस लिनच्या धडाकेबाज खेळीने मुंबई इंडियन्सची स्थिती भक्कम !
- ‘गोड बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमची वाट लावली!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
