Share

आयपीएल स्थगितीनंतर केकेआरच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण; भारतातच घेणार उपचार

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतत आहे. मात्र मायदेशी परतण्याआधी न्युझीलंड संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य टीम सिफर्ट याला कोरोनाची लागण झाली आहे. मायदेशी परतण्याआधी त्याची कोरोना चाचणी केली असता ती सकारात्मक आली आहे. त्यामुळे त्याला न्युझीलंडच्या इतर खेळाडूसोबत खासगी विमानात प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली.

सिफर्ट हा सध्या अहमदाबाद येथे विलगीकरणात असुन लवकरच उपचारासाठी त्याला चेन्नई येथे हलवण्यात येणार आहे. उपचारानंतर जेव्हा त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल तेव्हा त्याला न्युझीलंडला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र मायदेशात परतल्यानंतर १४ दिवसाचा विलगीकरणाचा कालावधी सिफर्टला पुर्ण करावा लागेल. सिफर्टला या स्पर्धेत एकाही सामन्यात केकेआरकडुन एकाही सामन्या संधी मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!