Share

आम आदमी पक्षाची आता गुजरातमध्ये मोर्चे बांधणी सुरू

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : आम आदमी पक्षाने आता गुजरातेत आपली मोर्चे बांधणी सुरू केली असून अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षाने आपली ताकद लाऊन येथून राज्याच्या मोर्चे बांधणीची सुरूवात करायचे ठरवले आहे.

त्यासाठी आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी अहमदाबादेत आज रोड शो केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाला आम आदमी पक्ष हाच पर्यायी पक्ष ठरू शकतो कारण कॉंग्रेसने आपली विश्‍वासार्हता गमावली आहे.

अहमदाबाद महापालिकेत गेली २५ वर्ष भाजपची सत्ता आहे पण अहमदाबाद मधील नागरीकांना किमान आवश्‍यकता सुविधा अजूनही मिळू शकत नाहीत. जे काम आम्ही दिल्लीत पाच वर्षात करून दाखवले तशा स्वरूपाचे काम भाजपला अहमदाबाद मध्ये गेल्या २५ वर्षात का करता आले नाही असा सवाल सिसोदिया यांनी केला.

ते म्हणाले की दिल्लीत आम्ही सरकारी शाळांचा दर्जा सुधारून गोरगरीबांच्या मुलांना उत्तम शिक्षण मोफत दिले. सरकारी रूग्णालयांमधील आरोग्य सेवा सुधारली. मोहल्ला क्‍लिनीक स्थापन करून नागरीकांच्या आरोग्याची आम्ही काळजी घेऊन त्यांना चांगल्या सेवा दिल्या. असे काम भाजपला अहमदाबादेत गेल्या २५ वर्षात का करता आले नाही असा सवालही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!