Share

…म्हणून मी संघाच्या कार्यक्रमाला गेलो, नितेश राणेंनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितेश राणे हे चांगलेचं चर्चेत आले आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर नितेश राणे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. राणे यांची ही हजेरी चर्चेची ठरली आहे. यावर नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आता मी ज्या पक्षात आलो आहे. त्या पक्षाला समजून घेणे, त्या पक्षाच्या मातृसंस्थेला समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून मी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, असे स्पष्टीकरण राणे यांनी दिले आहे. अनपेक्षितरित्या संघाच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीमुळे नितेश राणे सध्या चांगलेचं ट्रोल होत आहेत. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  मला ओळखणारे लोक मला ट्रोल करणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत.

नारायण राणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कणकवली मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपकडून लढणार आहेत. नितेश राणे हे आधी कॉंग्रेसमधून निवडणूक लढवायचे मात्र आता परस्पर विरोधी भूमिका असलेल्या पक्षात पक्षांतर केल्याने नितेश राणे सध्या चांगलेचं चर्चेत येत आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181865883255230464?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181863689265152001?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181865702010978305?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!