🕒 1 min read
पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. परंतु, सायं. ४ वाजेच्या सुमारास अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आहे. तसेच यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राजीनामा दिल्याचे कारण सांगितले.
I decided this morning to resign as Punjab CM, have informed Congress president about my decision: Amarinder Singh
— Press Trust of India (@PTI_News) September 18, 2021
पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की,’मी सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो होतो. त्यांना सांगितले होते की मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा हे होतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. मला वाटतं की माझ्यावर त्यांना संशय आहे की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय’. तसेच ‘दोन महिन्यांत तीन वेळा तुम्ही आमदारांना दिल्लीला बोलवले. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता ज्यांच्यावर त्यांना विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील. जे काही कारण असेल, त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला. ठीक आहे’ असेही ते म्हणाले.
I am feeling humiliated. I feel there is a doubt on my working. I have been in politics for 52 years. I will talk to my supporters and then I will decide on my future in politics: @capt_amarinder after resigning as Punjab CM | @IndianExpress pic.twitter.com/Llsxr58Rl2
— Express Punjab (@iepunjab) September 18, 2021
दरम्यान, पुढील राजकारणासाठी माझ्याकडे राजकीय पर्याय उपलब्ध आहेत. माझी आगामी काळात राजकीय भूमिका काय असेल हे माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून ठरवू असेही अमरिंदर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
