Share

OBC Reservation : “…म्हणून ओबीसी वाचवा टोपी लगेच घातली”, भुजबळांचा फडणवीसांवर निशाणा

Published On: 

मुंबई: ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्देशांपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. यावरूनच भाजपने ठाकरे सरकारला सुरु असलेल्या अधिवेशनात चांगलेच घेरले आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. यालाच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ म्हणाले की, “फडणवीस यांनी काल सुप्रीम कोर्टात काय झालं, त्यावर आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो. ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली गोष्ट आहे. म्हणून भाजपच्या एका भगिनीनं ओबीसी वाचवा टोपी घालून दिली, मी ती लगेचच घातली.”, असे ते म्हणाले आहेत.

तसेच तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि हा विषय सोडवूया. कोण कुठं काय काय बोललं हे सगळं आमच्याकडे आहे. मात्र केवळ दुरावा निर्माण करण्याचा तुमचा वाचवा हा शब्द तो बुडवा हा शब्द होईल असं करू नका, अशा शब्दांत भुजबळ यांनी फडणवीसांना टोलाही लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!