Share

…म्हणून मी आणि जानकर साहेब पवारांना भेटलो, रत्नाकर गुट्टेंनी सांगितलं कारण

Published On: 

नांदेड:- राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर व आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. दरम्यान, माझा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात आम्ही पवार साहेबांना भेटलो, असा खुलासा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. नांदेड विमानतळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

महादेव जानकर व आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला आलेलं अपयश आणि तीन पक्षांच्या आघाडीला मिळालेलं यश या पार्श्वभूमीवर जानकर यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!