Share

प्रक्रिया केंद्र २४ तास चालवून कचरा शून्यावर आणा : आयुक्त

Published On: 

औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपो बंद झाल्यापासून म्हणजेच २०१८ पासून महापालिका चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर शहरातील कचरा नेऊन टाकत आहे. आजघडीला येथे कचर्याचा मोठा डोंगर तयार झाला आहे. हा कचर्याचा डोंगर आगामी १५ दिवसात कोणत्याही परिस्थितीत साफ करा, कचरा प्रक्रिया प्रकल्प चोवीस तास चालवा पण कचऱ्याचे ढीग संपवा, अशी स्पष्ट ताकीद पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरूवारी (दि. २१) कंत्राटदार मायोवेसल्स कंपनीला दिली.

महापालिकेने राज्य शासनाच्या निधीतून चिकलठाणा आणि पडेगाव येथे सुमारे दीडशे टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले आहेत. तसेच कांचनवाडी येथे ३० टन ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर अद्याप शेकडो टन कचरा पडून आहे.

दरम्यान, गुरुवारी प्रशासकांनी चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी प्रकल्पावर पडून असलेला कचऱ्याचा ढिग पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. पडेगाव व चिकलठाणा हे दोन्ही प्रकल्प २४ तास चालवा पण तेथील कचऱ्याचे ढिग शून्य करा, बंद पडलेल्या कचरा सॉर्टिंग यंत्र लवकरात लवकर सुरु करण्याची सूचना त्यांनी घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना दिली. नारेगाव, चिकलठाणा येथील कचऱ्याच्या ढिगारामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराची रँकिंग कमी होते की काय? याचीच चिंता प्रशासनास लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!