Share

भालचंद्र मुणगेकर यांच्या घरावर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद काढणार निषेध मोर्चा 

Published On: 

मुंबई  – मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि काँग्रेसचे माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या वडाळा बरकत अली नाका येथील निवासस्थानी उद्या शनिवार दि.23  जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे आणि रिपब्लिकन पक्षाचे वडाळा तालुका अध्यक्ष विजय वाघमारे  यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिली आहे.

यासाठी वडाळा,एंटॉप हिल,माटुंगा या विभागातील आंबेडकरी जनतेने या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन रिपाइं चे तालुका अध्यक्ष विजय वाघमारे यांनी केले आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये अनियमित अनुचित व्यवहार करणाऱ्या तथा गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या अशोक तळवटकर यांच्या गैरकारभाराला समर्थन देण्यासाठी स्वतःला पीपल्स एज्युकेश सोसायटीचे स्वयंघोषित अध्यक्ष म्हणवून घेण्याचे चुकीचे पाऊल डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी टाकले आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीत गटबाजी माजविण्याचा निषेधार्ह  प्रकार डॉ भालचंद्र मुणगेकर करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर घरावर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माध्यमांना सांगण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असत की माझे पढे लीखे लोगोने धोका दिया है. तसेच डॉ भालचंद्र मुणगेकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष जाहीर करून आंबेडकरी जनतेला धोका देत आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अधिकृत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आहेत.त्यांच्या नेतृत्वात पी ई सोसायटी चा कारभार व्यवस्थित सुरू आहे. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अशोक तळवटकर यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष पदावरून काढून टाकल्या नंतर अशोक तळवटकर यांनी डॉ भालचंद्र मुणगेकर यांना गैर मार्गाने पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष असल्याचे जाहीर केल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदे ने केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!