Share

Thomas Cup 2022 : इतिहास रचलेल्या टीम इंडियाला पंतप्रधान मोदींचा फोन; ‘या’ खेळाडूशी मराठीतून साधला संवाद! पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : भारतीय बॅडमिंटन संघाने आज म्हणजेच रविवारी (१५ मे) इतिहास रचला. टीम इंडियाने प्रथमच थॉमस कप (Thomas Cup 2022) विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारताने विजेतेपद पटकावले आहे. विजेतेपदाच्या लढतीत स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि गतविजेत्या इंडोनेशियाचा भारताने ३-० असा पराभव केला. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम ट्वीट करून सर्वांचे अभिनंदन केले आणि त्यानंतर फोनवर खेळाडूंशी चर्चा केली.

फोनवर बोलताना पंतप्रधान खेळाडूंना म्हणाले, “तुम्ही अप्रतिम काम केले आहे. हा भारताचा सर्वोत्तम क्रीडा विजय आहे.” किदाम्बी श्रीकांतचे विशेष अभिनंदन करताना मोदी म्हणाला, ”तू एकही सामना गमावलेला नाहीस.” यासोबतच त्यांनी लक्ष्य सेनला अल्मोडा येथून मिठाई खाऊ घालायला सांगितली. मोदींनी चिराग शेट्टीशी मराठीत संवाद साधला.

बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताच्या विजयानंतर देशभरात आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही बॅडमिंटन विजेत्या संघाचे अभिनंदन करत बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला एक कोटी रुपये देण्याची घोषणा अनुराग ठाकूर यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही थॉमस कप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. या स्पर्धेत भारताने २०१६च्या चॅम्पियन डेन्मार्कला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!