🕒 1 min read
मुंबई : “कालच्या सभेला शिवसेना म्हणत होती मास्टरसभा मास्टरसभा पण पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं ही तर लाफ्टर सभा, लाफ्टर सभा. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काल मुंबईत झालेल्या सभेमुळे राज्यातलं राजकीय पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापलं आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अनेकांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. आता याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज सभा सुरु होती. फडणवीसांची ही उत्तरसभा आहे.
तसेच, “काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती आणि भगवान नृसिंहाची देखील काल जयंती होती. स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापी प्रवृत्तीचं पोट फाडलं असे भगवान नृसिंह या दोघांची काल जयंत होती. आम्हाला वाटलत होतं काही तेजस्वी, ओझस्वी ऐकायला मिळेल. मात्र लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. नेहमीच्या गोष्टीच आम्हाला ऐकायला मिळाल्या. काही नवीन गोष्ट आम्हाला ऐकयला मिळाली नाही.” असंही फडणवीस म्हणाले.
याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “कालच्या भाषणात आमचे एक मित्र सांगत होते, उद्धव ठाकरेंची सभा ही शंभर सभांची बाप सभा. खरंच आहे. १०० कोणासोबत होते? कौरवांसोबत होते. पांडवासोबत पाचच होते. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असे फडणवीस म्हणाले.
“मी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही उत्तर द्या. मुंबईत कोविड काळामध्ये भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख लोकांचा मृत्यू झाला की नाही?, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली की नाही? वसूलीच्या आड येणाऱ्यांना मनसूख हिरेन बनलं की नाही? १०० कोटींच्या वसूलीसाठी गृहमंत्री तुरुंगात गेले की नाही? दाऊदचा मित्र तुमच्या मंत्रिमंडळात आहे की नाही? आपल्या मजूर- कामगार बांधवांना अणवानी पायांनी मुंबई सोडावी लागली की नाही? मुंबईत मेट्रो, रस्त्यांची कामे बंद आहेत की नाही?, यशवंत जाधवची संपत्ती वाढली की नाही? आता मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही यापैकी एकाही गोष्टीवरही आपले मुख्यमंत्री बोलले का? आपले मुख्यमंत्री राज्याचे आणि देशातील पहिले मुख्यमंत्री असतील, की अडीच वर्षांमध्ये या महाशयांनी एकही भाषण राज्याच्या विकासावर दिलं नाही, राज्याच्या विषयावर, लोकांच्या समस्येवर दिलं नाही.” फडणवीसांनी आज अशा प्रश्नांचा भडीमार केला.
“आताच आपण हनुमान चालीसा पठण केली. हनुमान चालीसा तर आमच्या हृदयात असते. रवी राणा, नवनीत राणा आहेत ना ते नादान आहेत, त्यांना समजत नाही की, हनुमान चालीसेच्या दोनच ओळी उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच माहीत आहेत. फक्त त्या दोन ओळींवरच ते काम करत आहेत. कोणत्या दोन ओळी, राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसा रे… यामुळेच २४ महिन्यात ५३ मालमत्ता तयार झाल्या आणि यशवंत जाधवांनी आपल्या मातोश्रींना ५० लाखांचं घड्याळ भेट दिलं. माझा प्रश्न आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल का? की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणं राजद्रोह असेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणं हा राजशिष्टाचार असेल, त्यांनी कधी विचार केला असेल का?” असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार मंगलप्रभात लोढा, कृपाशंकर सिंह, संजय उपाध्याय, राजन सिंग, खासदार गोपाल शेट्टी, खासदार, मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, आमदार विद्या ठाकूर, आमदार जयप्रकाश ठाकूर आदीसंह भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
