अमरावती : AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्ताव दिला. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये टीकास्त्र चालू असल्याचे दिसत आहे.
एमआयएमच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं’ अशा शब्दात शिवसेनेवर टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांशी ऑनलाईन संवाद साधताना म्हणाले, “हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले. भाजपनं अफझल गुरूला फाशी नको म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्तींशी युती केली होती. या घटनांनंतरही तुम्ही आम्हाला जनाब सेना म्हणत असाल तर तुम्हाला पाकिस्तान जनता पक्ष किंवा हिजबुल जनता पक्ष म्हणायचे का”? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

