मुंबई : सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोन सुपरस्टार्समध्ये भांडण पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘हम तुम्हारे हैं सनम’ चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग बोलला जात आहे. चित्रपटाच्या या सीनमध्ये सलमान आणि शाहरुखची भांडणे होत असतात.
नेटकऱ्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. पण नीट पाहिल्यावर लक्षात येईल की, हे खरे शाहरुख-सलमान नसून त्यांचे डुप्लिकेट आहेत. व्हिडिओमध्ये शाहरुखची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव इब्राहिम कादरी आहे, तर सलमान खानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव परवेझ काझी आहे. इब्राहिम कादरी शाहरुखच्या भूमिकेत इतका परफेक्ट दिसतो की त्याच्या सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोविंग वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, त्याने फक्त शाहरुख खानला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फॉलो केले आहे. त्याचवेळी परवेझचे चाहतेही कमी नाहीयेत.
शाहरुख खानच्या आगामी ‘पठान’ चित्रपटात सलमान खान एक छोटी भूमिका साकारत आहे. अलीकडेच, सलमान खानबद्दल अशी बातमी आली होती की, जेव्हा त्याने शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील काही सीन पाहिले, तर भाईजानने त्याचे जोरदार कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

