Share

“बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला..” – अनिल बोंडेंची ठाकरेंवर जोरदार टीका

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्ताव दिला. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये टीकास्त्र चालू असल्याचे दिसत आहे. एमआयएमच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं’ अशा शब्दात शिवसेनेवर टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख हिजबुल जनता पक्ष असा करत फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

या प्रकरणात आता भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे उतरले असल्याचे दिसते. बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केलीय. म्हणाले, ‘बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणली’.

तसेच पुढे म्हणाले, हिंदू शिवसेनेची साथ सोडत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शिवसेना आता शरद पवारांची बी टीम म्हणून काम करतेय. गोवा, उत्तर प्रदेशात हिंदू समाजानं शिवसेनेला ‘नोटा’खाली झोपवलं. बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणल्याची टीका बोंडे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!