Share

‘…म्हणून काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्धच्या आंदोलनाचं नाटक केलं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रविवारी राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येने लाखाचा आकडा पार केला. आतापर्यंत 1,00,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.72% टक्के एवढा आहे. दरम्यान, राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली असून सर्वच प्रकारच्या इंधनात मोठी वाढ झाली आहे. यावरून काँग्रेसने देशभरात आंदोलन छेडले असून पोस्टरबाजी व आंदोलनाद्वारे मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण आणि काँग्रेसचे आंदोलन यावर आज टीकास्त्र सोडलं आहे.’राज्य सरकारला कोरोना प्रसार रोखण्यात आलेल्या अपयशावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन करण्याचे नाटक केले. राज्य सरकारने इंधनावरील कर दोनदा वाढविले असताना त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला नाही. काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किंमतच उरलेली नाही. त्यामुळे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलनाचा फार्स केला,’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात दहाव्या क्रमांकावर !

राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने नुकताच एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे. आघाडी सरकारला कोरोना प्रसारामुळे उद्भवलेली स्थिती योग्य तऱ्हेने हाताळता न आल्यानेच महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या 1 लाखापेक्षा अधिक झाली आहे. राज्य सरकारच्या या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात दहाव्या क्रमांकावर गेला आहे, असा आरोप देखील उपाध्ये यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!