जालना : तालुक्यातील एका गावातून ट्रॅक्टरवर चालकाने कॉलेजला निघालेल्या मालकाच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मे महिन्यात पळवून नेले होते. पोलीसांनी तपास करुन त्या मुलाला करमाळा तालुक्यातून अटक केली आहे.
दरम्यान, आरोपीने फूस लावून मुलीला विविध जिल्ह्यात नेले होते. या काळात त्यांच्यात झालेल्या संबंधामुळे ती मुलगी आता गर्भवती राहिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कॉलेजला गेलेली मुलगी परत न आल्यामुळे मुलीच्या पालकांनी मौजपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस या मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाने मुलीला पळवून नेले असून हे दोघेजण करमाळा तालुक्यात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मौजपूरी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालना महानगरपालिका होणार! नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
- जालना महापालिका होण्यास आमदार कैलास गोरंट्याल यांचा विरोध
- “जालना हा शिवसेनेचा बालेकिल्ला; खोतकरांनी केलेल्या विकासाच्या मागण्या पूर्ण करू”
- हिंगोलीतील असोलवाडीत कुक्कुटपालन केंद्रातील ३०० कोंबड्या दगावल्या
- भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली; दोघांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
