🕒 1 min read
चेन्नई : चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पहिला कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे.
तत्पुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघाची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. सामन्याच्या आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लड फिरकीपटू ओली स्टोनने शुभमन गिलला माघारी धाडलं.
संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याने मैदानावर असलेल्या रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारावर दबाव वाढणार असे दिसत होते मात्र. ‘हिटमॅन’ने कोणतेही प्रेशर न घेतला आक्रमक फलंदाजी केली.
यादरम्यान, ‘हिटमॅन’ रोहितने एक शानदार कव्हर ड्राइव्ह शॉट खेळला ज्याने स्टेडियमवर उपस्थतीत प्रेक्षकच नाही तर स्वतः कर्णधार कोहलीलाही सुपर इम्प्रेस केलं. बीसीसीआयने (BCCI) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितच्या या शानदार शॉटनंतर विराट आपल्या सहकारी खेळाडूसाठी टाळ्या वाजवताना दिसला.
Delectable drive from @ImRo45 ????
Applause from #TeamIndia skipper @imVkohli ????
Loud cheer from the Chepauk crowd ????Watch that moment ???????? https://t.co/rilK59Ik2n@Paytm #INDvENG pic.twitter.com/7xdkGB0xkF
— BCCI (@BCCI) February 13, 2021
महत्वाच्या बातम्या
- जालना महानगरपालिका होणार! नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
- जालना महापालिका होण्यास आमदार कैलास गोरंट्याल यांचा विरोध
- “जालना हा शिवसेनेचा बालेकिल्ला; खोतकरांनी केलेल्या विकासाच्या मागण्या पूर्ण करू”
- हिंगोलीतील असोलवाडीत कुक्कुटपालन केंद्रातील ३०० कोंबड्या दगावल्या
- भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली; दोघांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
