नाशिक : राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला असून राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशी सूचनाही केली आहे.
नाशिक जिल्ह्यात तर कोरोनाचा भयंकर प्रकोप पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी पुन्हा तीन हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१९, नाशिक ग्रामीणमध्ये १४०४, मालेगाव मनपा क्षेत्रात ११६ तर जिल्हाबाह्य क्षेत्रामध्ये ६९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांची संख्या तब्बल २६ हजार ६४३ वर पोहोचली आहे.
त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात आजपासून 10 दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु असणार आहे. देवळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ होत असताना ही साखळी खंडीत करण्यासाठी जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे या कालावधीत किराणा दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘थलाइवा यांचे अभिनंदन’, दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रजनीकांत यांचं मोदींकडून अभिनंदन
- ‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
- …की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?
- पुणेकरांसाठी मोठी बातमी, महपालिका आजपासून मोठ्या सोसायट्यांमधील कचरा उचलणार नाही
- राज्यात लॉकडाऊनची चर्चा; परराज्यातील कामगारांनी गावी परतण्यासाठी नियोजन सुरु केले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
