Share

पाकिस्तानी कर्णधार बिस्माहसाठी स्मृतीने केली विशेष पोस्ट म्हणाली…

Published On: 

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारुफसाठी एक विशेष भावनिक पोस्ट लिहली आहे. बिस्माहने मुलाला जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांनी खेळण्यासाठी परत येऊन जगभरातील महिला खेळाडूंसमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल “प्रेरणादायी” पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारूफचे कौतुक केले आहे.

भारतीय संघाने रविवारी महिला विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १०७ धावांनी पराभूत केल्यानंतर, काही भारतीय खेळाडू मारूफची मुलगी फातिमासोबत चांगले वेळ घालवताना दिसले आणि सहा महिन्यांच्या मुलीसोबत खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. याच पार्श्वभूमीवर स्मृतीने (smriti mandhana) तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर मारुफसाठी (bismah maroof) लिहले ” मुलीला जन्म दिल्यानंतर ६ महिन्यांत परत येणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे खूप प्रेरणादायी आहे. बिस्माह मारुफ जगभरातील क्रीडापटू महिलांसाठी एक उदाहरण प्रस्थापित करत आहे, भारताचे बेबी फातिमावर खूप प्रेम आहे आणि मला आशा आहे की ती तुझ्यासारखीच बॅट उचलेल कारण लेफ्टी स्पेशल असतात.”

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे बेबी फातिमा सोबत मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या पसंख्येने व्हायरल झाले होते. केवळ क्रिकेट रसिकांना नव्हेच इतर इतर क्षेत्रातील लोकांनाही ते दृश्य पाहून त्याचे कौतुक करणे राहावले नाही. सचिन तेंडुलकरनेही त्यांचे फोटो ट्विट करत लिहले “किती सुंदर क्षण! क्रिकेटला मैदानावर सीमा असतात, पण त्या सर्व मैदानाबाहेर मोडतात. खेळ सगळ्यांना एकत्र आणतो”. स्मृतीने बिस्माहसाठी लिहिलेली पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!