Share

वंचित विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट सिटी’ करणार स्मार्ट

Published On: 

औरंगाबाद: सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद महानगरपालिका सरसावली आहे. त्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण देण्याहेतू महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन आणि लाइट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यामध्ये सोमवारी (दि.१५) सामंजस्य करार करण्यात आला.

हा प्रकल्प स्टारलाईट टेक्नॉलॉजीसच्या सहाय्याने सुरू करण्यात येत आहे. जे की ह्या प्रकल्पाचे डोनर पार्टनर आहेत. तिन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई ह्यांचा विशेष उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शहरातील नागरीकांचे जीवनमान उंचावणे, तरूणाईला स्किल डेव्हलपमेंटचे धडे मिळावे याहेतूने तीन्ही संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

या कराराअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमधील तरूणांना प्रशिक्षण देण्यात येईल. पाच वर्षांसाठी हा करार असणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी भुमिका व जबाबदारी ‘एलसीएफ’ची असणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक खर्च सुरक्षित करण्याची जबाबदारी एलसीएफची असेल. प्रकल्पाची अंमलबजावणी होण्यासाठी एलसीएफ सहाय्य करणार आहे. सर्व टप्प्यात प्रकल्प संकल्पित व कार्यान्वित करण्यासाठी एएससीडीसीएल एलसीएफला मदत करेल.

मनपा प्रशासक तथा एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय, एलसीएफच्या सीईओ आणि संचालक रूची माथूर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन (एलसीएफ) कडून डायरेक्टर व सीईओ रुची माथूर, नॅशनल एक्सपांशन हेड, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त सीईओ अरुण शिंदे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे आणि नंदकिशोर भोंबे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!