मुंबई : ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू’, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली होती.
त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. ‘माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये’, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना टोला लगावला होता.
रविवारी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर खोचक टीका केली. त्याचे पडसात उमटत आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘एका महिला लोकप्रतिनिधीनं तयार केलेल्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन, त्या महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल करत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर शरसंधान साधलं आहे.
दरम्यान, भाजप नेते निलेश राणेंनी जयंत पाटलांवर पलटवार केलाय. अत्यंत शेलक्या शब्दात त्यांनी जयंत पाटलांचा समाचार घेतला आहे. ‘पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांतदादा पाटील साहेबांवर टीका करतायत. आम्हाला जयंत पाटीलांची अडचण माहीत आहे, साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार शेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं’, अशा आशयाचे ट्वीट करत राणेंनी पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांतदादा पाटील साहेबांवर टीका करतायत. आम्हाला जयंत पाटीलांची अडचण माहीत आहे, साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार शेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 15, 2021
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार हवेत, जनता ‘गॅस’वर! घरगुती गॅस ५० रुपयांनी महागला
- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव
- दुख:दायक! लग्नाला जाणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

