औरंगाबाद : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहराच्या जागेच्या बदल्यात ‘फिक्सिंग’ झाली होती, असा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. शिवाय विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ दोन नंबरवरती राहिला असा उल्लेखही त्यांनी याप्रसंगी करत शिवसेना व काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.
तर, मतदारांचा अनादर शिवसेनेने केला असल्याचा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेच्या विधानसभा निवडणुक फिक्सींगबाबत सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपा यांची युती होती. यावेळी काँग्रेसने दिवंगत, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली होती. धीरज देशमुख यांचा घवघवीत मताधिक्याने विजय झाला होता. या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसने फिक्सिंग केल्याचा आरोप निलंगेकरांनी केला होता.
यावर, देशमुख बंधूंपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘संभाजी पाटील निलंगेकर मागे मंत्री होते. त्यांचं सरकार राज्यात आणि केंद्रातही होतं. तेव्हा काही केलं नाही आणि आता ढुसण्या मारत आहेत. हे धंदे बंद करा,’ असं म्हणत अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे. दरम्यान, ‘संभाजी पाटील निलंगेकर यांचे आरोप हे फक्त ब्रेकिंग न्युजसाठी होते,’ अशी बोचरी टीका राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- ‘पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती’
- शिवजयंतीवर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये – अजित पवार
- …यावर मी गडकरी यांच्या मताशी सहमत: अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

