🕒 1 min read
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण आणि अनोखा निकाल दिला आहे. पत्नी सोबत खर्रा म्हणजेच मावा खाते म्हणून एका पतीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. यावर कोर्टाने नवऱ्याची याचिका फेटाळली आहे. पत्नी खर्रा खाते हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, नागपूरमध्ये शंकर आणि रिना यांचे २००३ साली लग्न झाले होते. पण लग्नानंतर दोघांमध्ये पटत नव्हते. रिना सतत माहेरी जाते, घरातील कामं करत नाही. तसेच रिनाला खर्रा खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळे रिनावर आजारी पडून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा खर्च आपल्याला परवडणारा नसल्याचे शंकरने म्हटले आहे.
यावर पती शंकरने कौटुंबीक न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा शंकर आणि रिनाचे लग्न टिकून रहावे यात दोन्ही मुलांचे हित आहे असे मत कौटुंबीक न्यायालयाने व्यक्त केले होते. यानंतर पती शंकरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने शंकरचे गाऱ्हाणे ऐकत इतर कारणे सामान्य असल्याचे म्हटले आहे. तसेच खर्रा खाणे ही वाईट आणि गंभीर गोष्ट आहे. पण ते घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांच्या खास मागणीस्तव, स्मार्ट सिटी बस आता नाईक नगर पर्यंत धावणार
- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव
- दुख:दायक! लग्नाला जाणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
