🕒 1 min read
मुंबई : आठवड्यातील ट्रेडिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. सोमवारी शेअर मार्केट इतिहासातील सर्वोच्च स्तरावर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 609.83 अंकांनी वधारून 52154.13 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 151.40 अंकांनी वाढून 15314.70 वर बंद झाला. तत्पूर्वी, सकाळी सेन्सेक्स 359.87 अंकांच्या वाढीसह 51,904.17 वर उघडला होता, तर निफ्टीने 107 अंकांच्या वाढीसह 15,270.30 वर सुरुवात केली होती.
आजच्या प्रमुख समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक तेजीत बंद झाले. तर, डॉक्टर रेड्डी, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, टाटा स्टील आणि टीसीएस यांचे शेअर्स लाल निशाणावर बंद झाले.
क्षेत्रीय इंडेक्समध्ये आज मीडिया, आयटी, मेटल आणि फार्मा लाल निशाणाच्या पातळीवर बंद झाले. ऑटो, एफएमसीजी, बँका, फायनान्स सर्व्हिसेस, रिअल्टी, पीएसयू बँका आणि खासगी बँका यांनी हिरवे निशाण गाठले.
आज बँकिंग क्षेत्रात जोरदार तेजी पाहायला मिळाली. आज अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँकेत सर्वात जास्त तेजी दिसून आली. याशिवाय एचडीएफसी, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, ओएनजीसी, भारती एअरटेल हिरव्या निशाणावर बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, टायटन, टेक महिंद्रा, एशियन पेंट, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि डॉ. रेड्डी यांचे शेअर्स लाल निशाणात बंद झाले.
परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) बाजारात निव्वळ विक्रेत्यांची भूमिका वठवली. शुक्रवारी एफपीआयने 37.33 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. दरम्यान, ब्रेंट क्रूड ऑइल 1.79 टक्क्यांच्या वाढीसह 63.55 डॉलर प्रति बॅरलवर होते.
महत्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
