औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
मुंबई, पुणे, अमरावती, रत्नागिरी या भागात कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. तसेच खास करून विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक झाली.
कोरोनाला वर्ष उलटून गेलं आहे. ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, त्या भागात टेस्टिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाबाबत नियम पाळले जात नाहीत हे दुर्दैवी आहे. जर नियम पाळले जात नसतील तर पुन्हा लॉकडाऊनकडे जाण्याची शक्यता आहे, असा अलर्ट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता आतापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा हात-पाय पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आपल्याकडेही पुन्हा लॉकडाऊन लागू करणार का? याबाबत शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांच्या खास मागणीस्तव, स्मार्ट सिटी बस आता नाईक नगर पर्यंत धावणार
- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव
- दुख:दायक! लग्नाला जाणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला


