Share

‘नितेश राणेंसारखी प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही’; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

Published On: 

🕒 1 min read

सांगली : शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यापासून राणे कुटुंबीय हे शिवसेनेसह महाविकास आघाडी विरोधात कमालीचे आक्रमक झाल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चक्क भाजप आमदार नितेश राणे यांची पाठ थोपटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सिंधुदूर्गमध्ये काल सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, विनायक राऊत, नितेश राणे उपस्थित होते. हे नेते एकाच मंचावर येणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. दरम्यान, ‘पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून काम करु,’ असं विधान नितेश राणे यांनी आपल्या भाषणात केलं.

यानंतर अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या असून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी नितेश राणे यांचं कौतुक करतानाच शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘नितेश राणे बोलले ही त्यांची प्रगल्भता आहे. दुर्दैवाने ती शिवसेनेकडे नाही,’ असं आशिष शेलार म्हणाले. सांगलीतील दौऱ्यात शेलारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय घडलं काल ?

‘सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,’ असं नितेश राणेंनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल.’ त्यांच्या या भाषणानंतर उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु असतानाच राणे आपल्या जागेवर जाऊन बसले आणि विनायक राऊत यांनी त्यांची पाठ थोपटली. त्यामुळे युतीबाबत अजूनही दोन्ही पक्षांमधील काही नेते हे इच्छूक असल्याचे तर्क लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!