Share

SL vs PAK : हसन अलीने सोडला सोपा कॅच, सोशल मीडियावर झाला तुफान ट्रोल; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात २ कसोटी सामन्यांच्या मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गाले येथे खेळला जात आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीने एक मोठी चूक केली. त्यामुळे तो आता सोशल मीडियावर तुफान नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे. या सामन्यात हसन अलीने सोपा झेल सोडला होता. पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाह गोलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. हसन अलीने श्रीलंकेचा ११व्या क्रमांकाचा फलंदाज कसून राजिताचा हातात आलेला सोपा झेल सोडला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेच्या रजिताने नसीम शाहच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन थेट स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला, जिथे हसन अली क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. अलीसाठी हा झेल पकडणे खूपच सोपे होते. पण, चेंडू हातात येताच त्याने सोपा वाटत असलेला झेल सोडला. हसन अलीचे हे गचाळ क्षेत्ररक्षण पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना पचवता आले नाही. त्यानंतर त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. यामध्ये हसन अलीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

हसन अलीकडून झेल सुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे सोपे झेल सोडले आहेत. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत मॅथ्यू वेडचा झेल त्याने सोडला होता. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १९व्या षटकात ही घटना घडली होती. यानंतर वेडने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सलग तीन षटकार मारून ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचवले होते. या पराभवामुळे पाकिस्तानचे दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. याच कारणामुळे हसन अलीने श्रीलंकेविरुद्ध पुन्हा असाच सोपा झेल सोडल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या दोन्ही संघातील कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी श्रीलंकेला डावात केवळ २२२ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने अप्रतिम गोलंदाजी करत ५ बळी घेतले. हसन अली आणि यासिर शाह यांनीही २-२ बळी आपल्या नावावर केले. श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिनेश चंडीमलने सर्वाधिक ७६ धावा केल्या. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्ताननेही २४ धावांत आपले दोन गडी गमावले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!