🕒 1 min read
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई बुधवारी उस्मानपुरा, पिरबाजार भागात करण्यात आली. विनोद प्रेमचंद महतोले (३२, रा. घर नंबर ५/२/५८, पिरबाजार, उस्मानपुरा) असे ताब्यातील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी देशी-विदेशी दारूचे ३८ बॉक्स, एक कार आणि मोबाईल असा ६ लाख १२ हजार ३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
देशी-विदेशी दारू कारमधून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी उस्मानपुरा, पिरबाजार भागातील हिंद मराठा हॉटेल समोर सापळा रचुन विनोद महतोले याला पकडले. यावेळी वाहनाची (एमएच-१२-डीजी-९७७८) तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख ७० हजारांची दारू यामध्ये देशी दारूचे ३७ बॉक्स व विदेशी दारूचा एक बॉक्स आढळून आला.त्यावरून त्याला पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) रविंद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, जमादार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, पोलीस नाईक भगवान शिलोटे, तात्याराव शिनगारे शिपाई रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरला येणारा ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, वेगळ्या भाषेचा उपयोग केल्यानंतर सोडला – थोरात
- घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीमध्ये ऑक्सिजन टँक बसवला
- संचारबंदीत नाथ घाट परिसरात फटफटी गँगचा धुमाकूळ!
- कोरोनामुळे झालेले मृत्यू म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने केलेली हत्या- खासदार जलील
- सुनेच्या खून प्रकरणी सासू-सासऱ्याला तीन महिन्यानंतर अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
