मुंबई: शिवसेना नेत्या दिपाली सय्यद सतत भाजपवर निशाणा साधत असतात. यावेळी त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्यापेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खुप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सुर्याला सुद्धा आम्ही भिक घालणार नाही. सुर्यावर कसे थुंकतात याचे धडे आम्हाला श्रीलंका कडुन घेण्याची गरज नाही. शिवसेना अंगार है।”, असा इशारा त्यांनी ट्वीट करत दिला आहे.
फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खुप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सुर्याला सुद्धा आम्ही भिक घालणार नाही. सुर्यावर कसे थुंकतात याचे धडे आम्हाला श्रीलंका कडुन घेण्याची गरज नाही. शिवसेना अंगार है । @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 1, 2022
दरम्यान काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297वी जयंती झाली. यानिमिताने चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.”
तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “राम शिंदे जे स्वत: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज आहेत, त्यांना देखील तिथे त्रास देण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर जे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या विचारांवर चालतात, त्यांना अडवण्यात येत आहे. मला हे समजतच नाही की अशाप्रकारे कब्जा करण्याचं कारण काय आहे? अशाप्रकारचं पर्व हे राष्ट्रीय पर्व असतं. सगळ्यांनी मिळून साजरं करायचं असतं. पक्षाच्या पलीकडे जाऊन साजरं करायचं असतं. इथे मात्र ते हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय, तो योग्य नाही. मला असं वाटतं या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि अशाप्रकारचं हायजॅकींग बंद झालं पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या:
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
- राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह; रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटले..
- “केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी”, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केला शोक
- गायक KK यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “कायम स्मरणात…”
- “गायक KK यांचं अकाली झालेलं निधन मनाला चटका लावणारं”, रोहित पवारांनी व्यक्त केला शोक


