सिंधदुर्ग: संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला तांत्रिकरित्या शरण आले आहेत. जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांना दहा दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार आज नितेश राणे कोर्टात शरण गेले असल्याचे दिसत आहे.
नितेश राणे यांच्या जामीन (Anticipatory bail) अर्जावर काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने नितेश यांना दहा दिवसात शरण येण्यास सांगितले होते. तसेच कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर नितेश यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.
यावेळी राणे यांच्यावतीने कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज करण्यात आला. नियमित जामिनासाठी अर्ज केल्यानंतर वकिलांनी कोर्टात नितेश यांची बाजू मांडली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणावर सोमवारी सुनावणी ठेवली. त्यानंतर राणेंच्या वकिलांनी मीडियाशी संवाद साधला. राणेंच्या नियमित अर्जावर सोमवारी ११ वाजता सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आम्ही मीडियाला स्टेटमेंट देऊ शकत नाही. सुनावणीवेळी काय निर्णय होतो ते पाहूनच बोलता येईल, असं नितेश यांच्या वकिलांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
“लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात”
“रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय क्रिकेटला कणा नसेल”; रवी शास्त्रींचा गांगुलीला टोला
वाईन विक्रीला वाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल- विनायक राऊत
“…हा सत्याचा विजय”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर जे.पी.नड्डा यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

