Share

‘ठाकरे सरकारने अहंकारमुळे…’; आशिष शेलारांचा घणाघात

Published On: 

मुंबई: पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घेतलेल्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी आता ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. मविआ सरकारच्या कृतीवर मा सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड लगावली आहे. तसे तर संसदीय कामात न्यायालयीन हस्तक्षेप नसतो. पण जेव्हा लोकशाहीची पायमल्ली होते, तेव्हा संविधानाचे रक्षण न्यायालयालाच करावे लागते. आता सरकारने या १२ मतदारसंघातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील ठाकरे सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. आशिष शेलार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. तसेच देशातील लोकशाहीला अंजन घालणारा हा निर्णय असल्याचे शेलार म्हणाले. पुढे ठाकरे सरकारवर टीका करताना शेलार म्हणाले, शहाण्याला शब्दांचा अर्थ कळतो, मात्र ठाकरे सरकारने अहंकारमुळे शहाणपण गमावले आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!