Share

“रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय क्रिकेटला कणा नसेल”; रवी शास्त्रींचा गांगुलीला टोला

Published On: 

मुंबई : १३ जानेवारीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार होती. मात्र स्पर्धेआधी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले होते. त्यानंतर स्पर्धेला अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आता यावर भारतीय संघाचे माजी कोच यांनी सोशल मीडियावरून टीका केली. त्यांनी बोलताना अप्रत्यक्षपणे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही टोला दिला आहे.

रवी शास्त्री यांनी ट्विटमध्ये लिहले. “रणजी ट्रॉफी भारतीय क्रिकेटचा कणा आहे. ज्या क्षणी तुम्ही त्याला दुर्लक्ष करायला लागाल तेव्हा आपल्या क्रिकेटला कणा उरणार नाही” रणजी ट्रॉफीच्या आयोजन संदर्भात झालेल्या बैठकीत बीसीसीआय सचिव जय शाह आणि अध्यक्ष सौरव गांगुली उपस्थित होते. त्यानंतर बीसीसीआयचे अधिकारी धुमाळ यांनी रणजी ट्रॉफीचे आयोजन दोन टप्प्यात करणार असल्याचे सांगितले होते.

“ऑपरेशन टीम हवामान आणि मैदानाच्या उपलब्धतेवर काम करत आहे. आम्ही स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुक आहोत आणि म्हणूनच आम्ही खेळाडूंच्या सुरक्षेशी तडजोड न करता स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्व प्रकारचे शक्यतो प्रयत्न करत आहोत , असे धुमाळ यांनी सांगितले आहे. मार्चपासून आयपीएलची सुरुवात होणार आहे. आयपीएलचे यंदाचे सामने भारतातच व्हावे यासाठी बीसीसीयकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफी एका टप्प्यात होणे शक्य नसल्याचे सांगितले गेले आहे. पहिला टप्पा फेब्रुवारीत तर दुसरा टप्पा आयपीएलनंतर घेण्याचे नियोजन बीसीसीआय करत आहे. मात्र रवी शास्त्रींनी केलेले हे ट्वीट अप्रत्यक्ष रित्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!