Share

उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू नाराज झालेली पण… ; सिंधूच्या आईने सांगितले रहस्य

Published On: 

नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिने ऐतिहासिक कामगिरी करता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. पीव्ही सिंधूला काल झालेल्या उंपात्य सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. यात तिला चायनिज ताईपाईच्या ताई झु यिंग कडून सलग दोन सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर कांस्य सामन्यात सिंधूने पुनरागमन करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे, यात तिने चीनच्या बिंग जिओ ही हीचा 21-13 21-15 असा पराभव केला आहे, यामुळे सलग दोन ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

पी.व्ही सिंधूवर सध्या विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले आहे. अशातच आता पी व्ही सिंधूची आई पी विजया यांनी देखील आपल्या मुलीच्या यशाबाबत आनंद व्यक्त केला आहे. पी विजया यांनी सिंधूच्या विजयाबाबत समाधान व्यक्त करताना, ‘आम्ही खूप आनंदी आहोत. तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले. आम्ही ती परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करू. उपांत्य फेरीतील पराभवानंतर ती निराश झालेली. मात्र आम्ही तिला नाराज न होता शांत राहून चांगला खेळ कर असं सांगितलं.’ असा खुलासा त्यांनी केला आहे.

तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘ ‘मी सध्या खूप आनंदात आहे. मी अनेक वर्षांपासून कठोर परिश्रम घेतले आहेत. माझ्या मते मी उत्तम कामगिरी केली. माझ्या मनामध्ये अनेक भावना घोंगावत आहेत, कांस्य पदक मिळाले म्हणून आनंदित व्हावं की अंतिम फेरीपर्यंत पोहचले नाही याच दुःख करावं’ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत स्पर्धेत दोन पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर दिग्गज पैलवान सुशील कुमार नंतर अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली आहे. सिंधूने याआधी 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. त्यानंतर यावर्षी कांस्यपदक मिळवत सिंधूच्या कारकिर्दीत आणखी चारचाँद लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!