Share

‘थापड झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे दुर्दैवी’ – दरेकर

Published On: 

मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सणसणीत इशारा दिला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली होती. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपच्या इतर नेत्यांकडूनही शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आज चांगलेच भडकले. थप्पड से डर नहीं लगता, असे म्हणत त्यांनी या कार्यक्रमात विरोधकांनाही इशारा दिला.

यावर आता भाजपने प्रतिउत्तर दिलेले आहे. भाजपचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत. ‘थापड झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. विरोधकांनी टीका केली असली तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अशी भाषा वापरणे योग्य नाही. ते जरी एखाद्या पक्षाचे प्रमुख असले तरी ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याने अशी टीका करणे संयुक्तिक नाही.’ असे मत त्यांनी यावेळी मांडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!