मुंबई : कप्तान फाफ डु प्लेसिसची ९६ धावांची खेळी आणि जोश हेझलवूडने घेतलेल्या ४ विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG vs RCB ) १८ धावांनी पराभव केला. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या विजयासह बंगळुरूचा संघ गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
लखनऊचा डाव
क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलने लखनऊच्या डावाची सुरुवात केली. जोश हेझलवूडने डी कॉकला (३) स्वस्तात बाद केले. त्यानंतर आलेला मनीष पांडेही (६) हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला. कप्तान केएल राहुलने ३० धावा केल्या, पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. डावखुरा फलंदाज कृणाल पंड्याने थो़डावेळ किल्ला लढवला, पण मॅक्सवेलने त्याला १४व्या षटकात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कृणालने ५ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. हेझलवूडने मार्कस स्टॉइनिसची (२४) दांडी गुल करत लखनऊच्या विजयाच्या आशा संपवल्या. २० षटकात लखनऊला ८ बाद १६३ धावांपर्यंतच पोहोचता आले. बंगळुरूकडून हेझलवूडने २५ धावांत ४ बळी घेतले.
Hazlewood stars as RCB defend a total once again to win two in a row ???? #LSGvRCB | #IPL2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 19, 2022
बंगळुरूचा डाव
लखनऊचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना माघारी धाडत बंगळुरूचा चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने प्रथम अनुज रावतला (४) केएल राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहलीला (०) दीपक हुडाकरवी गोल्डन डकचा शिकार बनवले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने झटपट २३ धावा केल्या, कृणाल पंड्याने त्याला बाद केले. यानंतर शाहबाज अहमदसोबत डु प्लेसिसने किल्ला लढवला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. १६व्या षटकात शाहबाज धावबाद झाला. त्याने २६ धावा केल्या. शतकाच्या जवळ पोहोचलेल्या डु प्लेसिसला जेसन होल्डरने तंबूत पाठवले. डु प्लेसिसने ११ चौकार आणि २ षटकारांसह ९६ धावा केल्या. शेवटच्या षटकात तो बाद झाला. या षटकात होल्डरने फक्त ४ धावा दिल्या. २० षटकात बंगळुरूला ६ बाद १८१ धावा करता आल्या.
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

