🕒 1 min read
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ( अमेरिका ) परराष्ट्र विभागाने संसदेत सादर केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात भारतात 2021 मध्ये अल्पसंख्याकांवर वर्षभर हल्ले झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2021 मध्ये भारतात अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांवर वर्षभरात हत्या, धमकावण्याचे प्रकार घडल्याचे अहवालात म्हटले आहे. स्टेट डिपार्टमेंटच्या ‘फॉगी बॉटम’ मुख्यालयात परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी हा अहवाल जारी केला आहे. या अहवालात जगभरातील धार्मिक स्वातंत्र्य आणि उल्लंघनांच्या स्थितीबद्दल दृष्टीकोन आणि प्रत्येक देशासाठी स्वतंत्र अध्याय आहेत.
भारताने यापूर्वी अमेरिकेचा धार्मिक स्वातंत्र्य अहवाल नाकारला होता. परदेशी सरकारला आपल्या नागरिकांच्या घटनात्मकदृष्ट्या संरक्षित अधिकारांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशी भारताची भूमिका होती. भारत या अहवालाबाबच धार्मिक अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर कोणतेही मत देण्याचे टाळतो. परंतु भारतीय मिडिया आणि भारत सरकारने नोंदवल्यानुसार विविध पैलूंचे दस्तऐवजीकरण या आहवालात करण्यात आले आहे.
अहवालाच्या भारत विभागात म्हटले आहे की, “धार्मिक अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांवर हल्ले आणि धमकावणे यासह वर्षभर चालू राहिले. यामध्ये गोहत्या किंवा गोमांस व्यापाराच्या आरोपांवर आधारित गैर-हिंदूंच्या विरोधात ‘गाय जागरूकता’च्या घटनांचा समावेश आहे.”
काही दिवसांपूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी जाहीरपणे सांगितले की “भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए समान आहे आणि त्यांना धर्माच्या आधारावर वागणूक दिली जाऊ नये.” याचा उल्लेख देखील अहवालात करण्यात आला आहे.
Today, @statedept released the 2021 International Religious Freedom Report. Respect for religious freedom isn’t only one of our deepest held values and a universal human right—it’s also a vital foreign policy priority. We must do more to combat rising forms of hate. pic.twitter.com/Gsl43J2jpa
— Secretary Antony Blinken (@SecBlinken) June 2, 2022
“देशावर कधीही हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही, फक्त भारतीयच वर्चस्व गाजवू शकतात. मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी घाबरू नये की भारतात इस्लाम धोक्यात आहे. गोहत्येसाठी बिगर हिंदूंना मारणे हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे”, या मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या उल्लेख देखील अहवालात आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
