कराड : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात रविवारी तब्बल ५७ हजार ७४ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्यामुळे स्थिती ही अधिकच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.
राज्यात फक्त शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल. या निर्णयाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.
दरम्यान, ‘आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा,’ असा सल्ला काँग्रेस नेते व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. आता राज्य सरकारने काल कडक निर्बंध लागू केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी या निर्णयावर देखील भाष्य केलं आहे. ‘राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा घेतलेला निर्णय सर्वांशी सल्लामसलत करुन घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासादायक आहे,’ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षा कशा घेणार ?, शिक्षणमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक
- मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा
- अनिल देशमुखांना ओपन चॅलेंज करणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत ?
- भालचंद्र शिरसाट यांना दिलासा देत मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने दिला जोरदार दणका
- न्यायालयाच्या निकालानंतर विरोधक आक्रमक,गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा धरला जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

